भोसरीत किरकोळ कारणावरून मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी, ता. २५ - शिवीगाळ केल्याच्या कारणावरून तरुणाला घरात बोलावून मारहाण केल्याची घटना एमआयडीसी भोसरी परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना रविवारी (ता. २३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास बालाजीनगर, एमआयडीसी भोसरी येथे घडली. याबाबत श्रावण वसंत गव्हाणे (वय ३० वर्षे, व्यवसाय – चालक, रा. सद्गुरूनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भरत भुजींग मोहीते (रा. बालाजीनगर, भोसरी) याने फिर्यादी यांना त्याच्या घरी बोलावून “तु मला शिवीगाळ का केली?” असा जाब विचारत हाताने मारहाण केली. त्यानंतर आरोपीचा मित्र नरेश रामु विटकर (रा. बालाजीनगर, भोसरी) याने लाकडी दांडक्याने फिर्यादी यांच्या डोक्यात, गालावर व छातीवर वार करून जखमी केले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११५(२), ३४११८(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा सोमवारी (दि. २४) पहाटे ३.२३ वाजता नोंदविण्यात आला. दोन्ही आरोपींना बीएनएसएस ३५(३) प्रमाणे नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance