घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार नागरिकांच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यात 

पिंपरी, ता. २५ - भोसरी परिसरातील साईदर्शन सोसायटीत रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा सात ते साडे सातच्या दरम्यान धर्मेंद्र अमरेंद्र झा यांच्या घरात चोरी झाली. चोरट्यांनी  घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि तब्बल ५७ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. स्थानिक नागरीकांनी चोरांचा पाठलाग करुन एकाला पोलिसांच्या ताब्यात दिले व दुसरा साथीदार पळून गेला आहे.  सागरसिंग सुरजसिंग (वय २७ वर्षे) असे अटक आरोपीचे नाव आहे.

घरफोडी चोरी करुन पळून जात असताना तेथील नागरिकांनी चोरांचा पाठलाग केला. आरोपींनी त्यांच्याकडील हत्यारांचा नागरिकांना धाक दाखवून, धमकावून घाबरविण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथील नागरिकांनी धैर्याने व शिताफीने चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, मात्र त्याचा अनोळखी साथीदार पळुन गेला. 

पकडलेला चोर आरोपी सागरसिंग सुरजसिंग ऊर्फ फंटयासिंग बावरी (अंधरेले) (वय-२७ वर्षे रा. गुरु गोविंदसिंग नगर) व त्याचा फरार झालेला साथीदार या दोन्ही आरोपींविरुध्द भोसरी पोलीस ठाण्यात  भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(७), ३०५,३ (५) आर्म अॅक्ट कलम ३ (२५), ४ (२५) म.पो.का. कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अटक आरोपी सागरसिंग सुरजसिंग ऊर्फ फंटयासिंग बावरी याचे कडून चोरी केलेला ऐवज, घरफोडीचे साहीत्य, धमकाविण्यासाठी वापरलेला चाकू तसेच पिस्तूलचा एक राऊंन्ड व मॅग्झीन जप्त करण्यात आले आहे. आरोपी हे जालना येथून आले होते व त्यांनी चोरी करण्यास वापरलेली मोटार सायकल ही चोरीची असून त्याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी सागरसिंग हा सध्या येरवडा कारागृहमध्ये आहे. त्याचेवर जालना व नागपुर येथे एकुण १७ गुन्हे दाखल आहेत. तो सराईत घरफोडी करणारा गुन्हेगार आहे. दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक सुहास खाडे करत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance