हातभट्टीच्या दारुचे रसायन बनवल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा

हातभट्टीच्या दारुचे रसायन बनवल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा

हातभट्टीच्या दारुचे रसायन बनवल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा 

पिंपरी, ता. ३  - हातभट्टीची दारु बनवण्यासाठी लागणारे ५ लाख रुपयांचे १०,००० लीटर रसायन पोलिसांनी पकडले आहे. हे रसायन बनवणाऱ्या महिलेवर पोलिसांनी सोमवारी (ता. २) चाकण उत्तर पोलीस ठाण्यात   गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई खेड तालुक्यातील भोसे गाव परिसरात करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  १ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास मौजे भोसे गावच्या हद्दीत सुकाळा डोंगराच्या पायथ्याशी पाझर तलावाजवळ झाडाझुडपांत पोलिसांनी छापा टाकला.  

तिथे आरोपी महिला ५,००,०००/- रुपयांचे  १०,००० लिटर गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे गुळ मिश्रीत रसायन भिजत घातले होते.  

या प्रकरणी महिलेविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अटक नाही. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories