बिजलीनगरमध्ये मटका जुगारावर कारवाई

बिजलीनगरमध्ये मटका जुगारावर कारवाई

बिजलीनगरमध्ये मटका जुगारावर कारवाई

पिंपरी, ता. २१ - बिजलीनगर-चिंचवड येथे चिंचवड पोलिसांनी मटका जुगारावर शुक्रवारी (ता. २०) छापा टाकून कारवाई केली.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. २०)  दुपारी १.०५ वाजता होटल जय मल्हारच्या मागील सार्वजनिक मोकळ्या जागेत काही जण विनापरवाना ‘कल्याण’ नावाचा मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकून पाच जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

या कारवाईत जुगार साहित्य व रोख रक्कम ४,५०० रुपये जप्त करण्यात आले. आरोपींमध्ये प्रमोद नागनाथ साठे (वय ३८), मच्छिंद्र एकनाथ कांबळे (वय ६०), माणिक सिताराम गुंजाळ (वय ५०), आनंद तुकाराम थोरात (वय ४२) यांचा समावेश असून एका मटका चालक शिरसाठ याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories