news
clock
शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवून ११ कोटी १३ लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवून ११ कोटी १३ लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवून ११ कोटी १३ लाखांची फसवणूक

पिंपरी, ता. २१ - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास नफा होईल या आमीषाला बळी पडल्याने पिंपरी-चिंचवडमधील एका इसमाची तब्बल ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. नोव्हेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात सायबर पोलिसांनी  शुक्रवारी (ता. २०) गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर सायबर फसवणूकीच्या घटनेमध्ये एकूण ९ आरोपींचा समावेश आहे. आरोपींनी फिर्यादीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यासाठी, Fyers ही कंपनी सेबी रजिस्टर आहे असे सांगून कंपनीचे बनावट सेबीचे प्रमाणपत्र दाखवले. आम्ही सांगेल त्या स्टॉक/आय पी ओ मध्ये गुंतवणूक केल्यास आर्थिक फायदा होईल असे आमीष दाखवले आणि व्हाट्सअॅपग्रुप वरती शेअर/आय.पी.ओ खरेदी करणेकरीता माहीती दिली. पुढे, वेगवेगळ्या बॅंक खात्यांमध्ये गुंतवणूकीच्या बहाण्याने फिर्यादीकडून एकूण ११ कोटी १३ लाख रुपये घेतले. फिर्यादीचा विश्वास संपादन केला मात्र, गुंतविलेली कोट्यवधींची रक्कम फिर्यादीस परत न करता त्या रकमेचा अपहार केला. 

या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३३८,३१८ (४), ३१६ (२), ३ (५) सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारीत) कायदा २००८ चे कलम ६६ (सी), ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आरोपी पुढीलप्रमाणे - १) नैना वर्मा व्हाट्सअॅप नं. +९१७३८३७५०४५९, २) प्रोफेसर गोपाल कावेलीरेड्डी व्हाट्सअॅप नं. +९१८४२९६७३९९५, ३) अकाउंटटंट व्हाट्सअॅप नं. +९१९५८६१६६७१३,४) A-9 Journey of Friendship व्हाट्सअॅप ग्रुप मधील सदस्य, ५) A-55 FYS user exclusive service या व्हाट्सअॅप ग्रुप मधील सदस्य, ६) https://apps.apple.com/us/app/fyersdma/id6749257833 लिंकधारक, ७) Fyers-DMA या गुंतवणुक अॅप्लीकेशनचा धारक, ८) supportfyers.us चा धारक, ९) वर नमुद सर्व बैंक अकाऊंट धारक

-------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories