news
clock
पिंपरीमध्ये मटका जुगारावर पोलिसांचा छापा, सहा जणांना नोटिस

पिंपरीमध्ये मटका जुगारावर पोलिसांचा छापा, सहा जणांना नोटिस

पिंपरीमध्ये मटका जुगारावर पोलिसांचा छापा, सहा जणांना नोटिस 

पिंपरी, ता. ८ - डिलक्स चौक-पिंपरी येथे बेकायदेशीर कल्याण मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले असून ६,५०० रुपयांचे जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ७) दुपारी सुमारे १.५० वाजण्याच्या सुमारास डिलक्स चौक, पिंपरी येथील राजश्री लॉटरी सेंटरसमोरील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात रात्री ७.५४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई शिवाजी नामदेव मुंडे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये मधुकर धोंडीराम चौधरी (वय ५२), राम अंकुश दंडगुळे (वय २६), मोहम्मद आयुब मोहम्मद नशीर मंसुरी (वय ३८), सोमनाथ नबाजी शिंदे (वय ५०), लक्ष्मण पांडुरंग रणदिवे (वय ४८) आणि विनोद वासुदेव एकबोटे (वय ४४) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी हे काळेवाडी व पिंपरी परिसरातील रहिवासी आहेत.

 आरोपी हे स्वतःच्या फायद्यासाठी “मुंबई कल्याण” नावाचा मटका जुगार विनापरवाना चालवत व खेळत होते. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराशी संबंधित साहित्य असा एकूण ६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. आरोपींना बीएनएसएस कलम ३५(३) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories