news
clock
पिंपळे सौदागरमध्ये 'पुस्तके आपल्या दारी' उपक्रमाला मोठा प्रतिसाद

पिंपळे सौदागरमध्ये 'पुस्तके आपल्या दारी' उपक्रमाला मोठा प्रतिसाद

पिंपळे सौदागरमध्ये 'पुस्तके आपल्या दारी' उपक्रमाला मोठा प्रतिसाद 

पिंपरी, ता. २८ - मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 'पुस्तके आपल्या दारी' हे पुस्तक प्रदर्शन नुकतेच पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन सोसायटी परिसरात आयोजित केले होते. पिंपरी-चिंचवड कल्चरल फाउंडेशन आणि भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने आयोजिलेल्या या उपक्रमाला परिसरातील नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. १) खुले राहणार आहे. 

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी प्रदर्शनाला भेट दिली. काटे म्हणाले की, ''हा उपक्रम स्तुत्य असून, समाजात वाचनाची संस्कृती जपण्याचे महत्त्व अधोरेखित करतो. आजच्या डिजिटल युगात पुस्तकांशी नाते टिकवून ठेवणे आवश्यक आहे. मुलांनी आणि तरुणांनी दर्जेदार साहित्य वाचून विचार समृद्ध करावा. ''

उद्घाटन समारंभाला भाजप सांस्कृतिक प्रकोष्ट जिल्हाध्यक्ष तथा संयोजक विजय भिसे, नगरसेविका कुंदा भिसे, अनिता काटे, उद्योजक संजय भिसे, कोषाध्यक्ष राजाभाऊ मासुळकर व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories