news
clock
संत तुकारामनगर परिसरात 'जागतिक शांतता आवाहन' फेरी

संत तुकारामनगर परिसरात 'जागतिक शांतता आवाहन' फेरी

संत तुकारामनगर परिसरात 'जागतिक शांतता आवाहन' फेरी 

पिंपरी, ता. ९ -  आखाती देशांमधील युद्ध थांबावे व जगात शांतता प्रस्थापित व्हावी.... यासाठी संत तुकारामनगर परिसरात 'जागतिक शांतता आवाहन' फेरी काढण्यात नुकतीच आली. भाजप प्रणीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले यांनी या फेरीचे आयोजन केले होते.

संत तुकाराम महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन फेरीची सुरुवात झाली. त्यानंतर पंचशील बौद्ध विहारात भगवान गौतम बुद्धांना वंदन केले. श्री गणेश मंदिरात दर्शन घेतले. विविध धर्माच्या स्थळांना भेट देत जागतिक शांततेसाठी विविध धर्माच्या स्थळांना भेट देत जागतिक शांततेसाठी प्रार्थना केली. मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून संत तुकाराम महाराज हॉल येथे राष्ट्रगीताने या फेरीची सांगता झाली.

फेरीमध्ये मंगेश धाडगे, मुन्ना बाविस्कर, दिनेश पाटील, दीपक पाटील, नंदू कदम, अमोल घोरपडे, शंकरराव शितोळे, ओंकार जोखारे, राहुल शितोळे, लता पाटील, अंकुश वाघमारे, स्वानंद राजपाठक, ईश्वर गायकवाड, शंकरराव गावडे यांनी सहभाग घेतला.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories