बीअर कंपनीतून चोरीला गेलेल्या 36 लाख रुपयांच्या बीअर स्टोअरेज टाक्या चोरट्यांकडून जप्त, ६ आरोपींना अटक

बीअर कंपनीतून चोरीला गेलेल्या 36 लाख रुपयांच्या बीअर स्टोअरेज टाक्या चोरट्यांकडून जप्त, ६ आरोपींना अटक

 बीअर कंपनीतून चोरीला गेलेल्या 36 लाख रुपयांच्या बीअर स्टोअरेज टाक्या चोरट्यांकडून जप्त, ६ आरोपींना अटक

 उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलिसांच्या तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी 

पिंपरी, ता. २ - चाकण महाळुंगे औद्योगिक परिसरातील एका बीअर कंपनीतून चोरीला गेलेल्या ३६ लाख रुपयांच्या बीअर स्टोअरेज टाक्या    उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलिसांच्या तपास पथकाने शोधून काढल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अनेक सीसीटिव्हींचे फुटेज तपासले. त्यावरुन सहा आरोपींना अटक केली आहे. चोरीला गेलेला माल कुदळवाडी, चिखली व मुंब्रा ठाणे येथून जप्त करण्यात आला आहे. 

चाकण महाळुंगे औद्योगिक परिसरातील मौजे सावरदरी (ता.खेड) येथील टाईने रिबेल या नावाने नविन उभारत असलेल्या बीअर कंपनी मधील 36 लाख रुपये किंमतीच्या 10 लहान मोठ्या आकाराच्या बीअरच्या टाक्या  20 फेब्रुवारी 2026 ते 30 मार्च 2026 या कालावधीत अज्ञात चोरटयाने चोरी केल्याचा गुन्हा उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम 305 अन्वये दाखल करण्यात आला होता. याबाबत विवेक मारुती खैरे यांनी तक्रार दिली होती. फिर्यादी विवेक खैरे यांनाच कंपनीतील चोरी बाबत सुमारे 40 दिवसांचे नंतर माहिती मिळाली होती. त्यामुळे उशीरा दाखल गुन्हयातील अज्ञात चोरट्यांचे शोधा करीता सहजासहजी उपलब्ध होणारे कोणत्याही प्रकारेचे धागेदोरे नव्हते. 

या गुन्ह्याचा तपास करताना, परिमंडळ - ४ च्या पोलिस उप-आयुक्त श्वेता खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास पथकाला मार्गदर्शन केले. त्यानुसार तपास पथकाने घटनास्थळाच्या नजिकचे सुमारे 30 ते 35 कंपन्यांचे दिड महिन्याचे कालावधीतील 600 जी.बी. पेक्षा जास्त डाटा असलेले सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यात संशयीत क्रेन व ट्रक निश्चित केला. फिर्यादीच्या कंपनीतील कामगार, आर्थिक गुंतवणुकदार, भागीदार यांच्यावरील संशयाच्या दृष्टीने तपास केला. तेव्हा संशयीत क्रेन व ट्रक वरील चालक, फिर्यादीचा विश्वासू कामगार प्रसाद राजळे याने सदरची चोरी घडवून आणल्याचे निष्पन्न झाले. 

उपलब्ध पुराव्यांच्या आधारे प्रसाद राजळे याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. प्रसाद राजळेसह स्टिल टाक्या चोरी करुन नेणारे व चोरीचे टाक्या खरेदी करणाऱ्या एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. चोरीला गेलेल्या 36 लाख रुपये किंमतीच्या 10 लहान मोठ्या आकाराच्या बीअर स्टोअरेज टाक्या कुदळवाडी, चिखली व मुंब्रा ठाणे येथून जप्त करण्यात आल्या आहेत.

अटक आरोपींची नावे :-

1. प्रसाद विनोद राजळे, वय 29 वर्ष, रा. पिरंगुट, ता. मुळशी, जि.पुणे

2. चंदन अर्जुन सिंग, वय 38 वर्षे रा. रिव्हर चौक, कुदळवाडी, चिखली, पुणे

3. अली अहमद चौधरी, वय 32 वर्ष, रा. कुदळवाडी, चिखली पुणे

4. फिरोज असगर अली खान, वय 38 वर्षे रा. मोशी, ता. हवेली, जि.पुणे

5. किसनकुमार सुभाषचंद्र गुप्ता, वय 24 वर्षे रा. कुदळवाडी, चिखली, जि.पुणे

6. नियाज मोहम्मद इसराईल, वय 51 वर्षे रा. रशिद कंपाऊंड, मुंब्रा, ठाणे

सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त, प्रादेशिक विभाग  बसवराज तेली,  परिमंडळ ४ च्या पोलिस उप-आयुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन कदम यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलिस अंमलदार राजु कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, मंगेश कदम, गणेश गायकवाड, संतोष वायकर, हरी रणदिवे, शुभम खंडागळे, साहिल सांडभोर, मंगेश घोलप, समीर महत यांनी केली आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories