news
clock
चाकणमध्ये पैशाच्या वादातून रिक्षा चालकावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक

चाकणमध्ये पैशाच्या वादातून रिक्षा चालकावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक

चाकणमध्ये पैशाच्या वादातून रिक्षा चालकावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक

पिंपरी, ता. २५ - पैशाच्या वादातून  रिक्षाचालक युवकावर तिघांनी जीवघेणा  हल्ला केला. त्या रिक्षाचालकाच्या भावालाही मारहाण केली. ही घटना सोमवारी (ता. २३)  रात्री साडेनऊच्या सुमारास चाकणमधील तळेगाव चौकात घडली.

या प्रकरणी रिक्षाचालक योगेश मधुकर मंगडे (वय २० वर्षे, रा. चाकण, ता. खेड) याने चाकण दक्षिण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत १) नामदेव प्रकाश नाईक (वय २४ वर्षे रा. चाकण ता. खेड), २) लोकेश विलास खंडाळे (वय २७ वर्षे, रा. कोढवा भैरवनाथ मंदिरा जवळ चाकण ता. खेड) व ३) दिप्तेश विलास खंडाळे वय २५ वर्षे (रा. चाकण, ता. खेड) हे आरोपी असून त्यांना अटक केली आहे. 

सोमवारी (ता. २३) फिर्यादी तळेगाव चौकात उभे असताना आरोपींनी  फिर्यादी योगेश व फिर्यादीचा भाऊ हनुमंत मुंगडे यांना  पैसे मागण्याच्या उद्देशाने दगडाने, हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. हनुमंत याच्या तोंडावर मारुन त्याला जखमी केले व योगेशला जीवे मारण्याचे उददेशाने मोठा दगड उचलून 'थांब तझा मर्डरच करतो' असे म्हणून मारला आहे. 

अटक आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ३०८(२), ३(५)३५१(२) फौ. सु. का ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories