चिंचोशी पोल्ट्री फार्मवरून २ लाखांचा माल लंपास; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा
Feb 18 2026
67
चिंचोशी पोल्ट्री फार्मवरून २ लाखांचा माल लंपास; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा
पिंपरी, ता. १८ - खेड तालुक्यातील चिंचोशी येथील पोल्ट्री फार्मवर २ लाख ७ हजार रुपयांचा माल लंपास केल्याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी अनिल मांजरे (रा. शिरोली, ता. खेड, जि. पुणे) यांनी चाकण उत्तर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत त्यांच्या पोल्ट्री फार्मवर काम करणाऱ्या तुकाराम भाऊराव राऊत (रा. पांघुळघर खरशेत, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) आणि एका अन्य महिला आरोपीने ७५ हजार रुपयांच्या ३७० बॉयलर कोंबड्या आणि १ लाख ३२ हजार रुपयांची ६० पोती कोंबडखाद्य परस्पर नेले आहे.
सदर प्रकरणी चाकण पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम ३१६, ३(५) व भादंवि कलम ४०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.