news
clock

भरधाव डंपरच्या धडकेत १४ वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू 

पिंपरी, ता. १२ - चिंचवड येथील प्रेमलोक पार्क परिसरात भरधाव डंपरच्या (आरएमसी ट्रक) धडकेत सायकलवरुन घरी जाणाऱ्या १४ वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकुर्डीहून चिंचवडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी (ता. १२) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. फारुक शकील तांबोळी (वय १४) हा नववीत शिकणारा विद्यार्थी सायकलवरुन शाळेतून घरी जात असताना भरधाव आरएमसी ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यामध्ये ट्रकची धडक स्पष्टपणे दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रक चालकासह ट्रक ताब्यात घेतला असून पुढील कारवाई सुरु केली आहे. या संदर्भात पोलिस निरीक्षक दत्ता चासकर यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असून अपघाताबाबत अधिक तपास केला जात आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories