news
clock
ग्रेडसेपरेटरमध्ये थांबलेल्या ट्रकला धडकून दुचाकीस्वाराने गमावला जीव

ग्रेडसेपरेटरमध्ये थांबलेल्या ट्रकला धडकून दुचाकीस्वाराने गमावला जीव

ग्रेडसेपरेटरमध्ये थांबलेल्या ट्रकला धडकून दुचाकीस्वाराने गमावला जीव 

पिंपरी, ता. ३० - काळभोरनगर-चिंचवड येथे ग्रेड सेपरेटरमध्ये थांबलेल्या ट्रकला  दुचाकीस्वाराने जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (ता. २९) पहाटे घडला  आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात २९ मार्च रोजी पहाटे सुमारे ३.३४ च्या सुमारास काळभोरनगर-चिंचवड येथे हनुमानच्या पुतळ्यासमोरील जुन्या पुणे-मुंबई ग्रेड सेपरेटरवर एक ट्रक पाठीमागील दोन टायर फुटल्यामुळे रस्त्याच्या उजव्या लेनमध्ये नादुरुस्त अवस्थेत उभा होता. ट्रकचे तोंड निगडीकडे तर मागील बाजू पुण्याकडे होती. 

 तेजस संजय निजामपुरकर (वय ३२, रा. निगडी) या तरुणाने भरधाव वेगात व बेदरकारपणे वाहन चालवत नादुरुस्त उभ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला, छातीला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलीस हवालदार सचिन विठ्ठल जाधव (पिंपरी पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली असून भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories