वाकडमध्ये मटका जुगार खेळणाऱ्या १९ जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. १९ - वाकड परिसरातील १६ नंबर बसस्टॉप समोर छापा टाकून मटका जुगार खेळणाऱ्या १९ जणांना बुधवारी (ता. १८) गुन्हे शाखा युनिट - २ च्या पथकाने पकडले. या तरुणांकडून १९ हजार २२०/- रोख रक्कम, मटका जुगाराचे आकडे लिहण्यासाठीची डायऱ्या, चिठ्या, चार्ट, बॉलपेन असे जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची नावे पुढीलप्रमाणे - १) कुमार सखाइँम लोहार (वय ३१ वर्षे), (२) आनंद साहेबराव चितापल्ले (वय-५२ वर्षे) , (३) नारायण हरिभाऊ जाधव (वय-५१ वर्षे), (४) उदय अनंत मुळे (वय ६२ वर्षे), (५) संतोष प्रल्हाद जगताप (वय ३७ वर्षे), (६) सचिन ज्ञानोबा काळे (वय ३० वर्षे), (७) रामकिशन प्रल्हाद गायकवाड (वय ३१ वर्षे), (८) दिनेश पितांबर कांबळे (वय २१ वर्षे), (९) रामु सटवा धोत्रे (वय ३४ वर्षे), (१०) सचिन मोहन शिंदे (वय-३७वर्षे), (११) अभिषेक रमेश बंचकर (वय-२० वर्षे), (१२) कल्पेश रामराव इकले (वय-२८ वर्षे), (१३) सुरेश रामदास भराटे (वय ४२ वर्षे), (१४) सोनु नवीन थोरात (वय-२१ वर्षे), (१५) समाधान शिवाजी पवार (वय-२३ वर्षे), (१६) अविनाश नरहरी वावळे (वय ३० वर्षे), (१७) अंकुश राजाराम अडसुळ (वय-४२ वर्षे), (१८) नवशाद अबरार सय्यद (वय-२६ वर्षे), (१९) शुभम दिलीप टाकसांडे (वय-२६ वर्षे)