news
clock
पाल्याच्या कॉलेज प्रवेशाचे आश्वासन देऊन पावणे सहा लाखांची फसवणूक, कर्नाटकातील आरोपीविरोधात दिघी पोलिसांत गुन्हा

पाल्याच्या कॉलेज प्रवेशाचे आश्वासन देऊन पावणे सहा लाखांची फसवणूक, कर्नाटकातील आरोपीविरोधात दिघी पोलिसांत गुन्हा

पाल्याच्या कॉलेज प्रवेशाचे आश्वासन देऊन पावणे सहा लाखांची फसवणूक, कर्नाटकातील आरोपीविरोधात दिघी पोलिसांत गुन्हा

पिंपरी, ता. २५ -  मुलीला नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देत ५ लाख ४५ हजार रुपये घेऊन एका पालकांच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार चऱ्होली येथील पालकांबाबत घडला आहे. ही घटना ६ एप्रिल २०२४ ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणी दिघी पोलिस  ठाण्यात कर्नाटक येथील आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

 बिरनारायण गोरख सिंग (वय ४६, व्यवसाय – बांधकाम, रा. फ्लॅट नं. ए-११०५, ड्रीम्स कार्निवल सोसायटी, च-होली फाटा, च-होली, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी शरणगौड रुद्रगौड बिरादार (वय ४८, रा. देवरहिप्परगी, ता. सिंदगी, जि. विजयापूर, राज्य कर्नाटक) याने सिंग यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या मुलीचा कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करुन देण्याचे आश्वासन दिले.

आरोपीने प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक शुल्क व इतर खर्चाच्या कारणावरून फिर्यादींकडून वेळोवेळी ऑनलाईन व्यवहार, आरटीजीएस तसेच रोख रकमेच्या स्वरूपात एकूण ५ लाख ४५ हजार रुपये घेतले. मात्र संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश न मिळवून दिला नाही आणि फिर्यादीकडून घेतलेल्या पैशांची परतफेड करण्यास टाळाटाळ केली. पैशांबाबत विचारणा केल्यावर शिवीगाळ करुन धमकी दिली, असे पोलिसांनी सांगितले आहे. 

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी सिंग यांनी मंगळवारी (ता. २४) दिघी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१६ (२), ३१८ (४) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपीस अद्याप अटक करण्यात आलेली नाही, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories