विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर

पिंपरी, ता. २४ - महापालिकेच्या स्थायी समितीपाठोपाठ विविध विषय समित्यांच्या सभापती निवड प्रक्रियेचा कार्यक्रम विभागीय आयुक्तांनी जाहीर केला आहे. त्यानुसार बुधवारी (ता. २५) दुपारी ३ ते ५ या वेळेत इच्छुक सदस्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत. सोमवारी, २ मार्चला सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत निवड प्रक्रिया होणार आहे.  

विविध विषय समित्यांमध्ये विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, शिक्षण आणि क्रीडा- कला साहित्य व सांस्कृतिक या समित्या आहेत. या समिती सदस्यांची निवड शुक्रवारी (ता.२०) सर्वसाधारण सभेत झाली आहे. आता समितींच्या अध्यक्षांची निवड २ मार्चला होणार आहे. त्यासाठी पिठासीन अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयक्त पृथ्वीराज बी. पी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रम -  (दोन मार्च २०२६)

- विधी समिती - सकाळी : ११.००

- महिला व बालकल्याण समिती - सकाळी ११.३०

- शहर सुधारणा समिती - दुपारी १२.००

- क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती - दुपारी १२.३०

- शिक्षण समिती -  दुपारी १.००

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance