news
clock
आळंदी येथे बांधकाम साईटवर मजूराचा मृत्यू

आळंदी येथे बांधकाम साईटवर मजूराचा मृत्यू

आळंदी येथे बांधकाम साईटवर मजूराचा मृत्यू 

पिंपरी, ता. २ - बांधकाम साईटवर काम करताना पहिल्या मजल्यावरुन पडून एका मजुराचा मृत्यू झाला. या प्रकरणी बुधवारी (ता. १) आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार , दि. २२ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता आळंदी येथील भाजी मार्केट परिसरातील सर्व्हे क्र. १अ/२३ येथे नवीन इमारतीचे बांधकाम सुरु असताना अपघात घडला. कामगार सुभाष प्रल्हाद हारीमकर (वय २७) हा पहिल्या मजल्यावर काम करत असताना खाली पडला. या अपघातात त्याला डोक्याला गंभीर जखम झाली आणि उपचार सुरु असताना दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ७ वाजता त्याचा मृत्यू झाला. आरोपी ठेकेदार वैभव कस्पटे यांनी कामाच्या ठिकाणी कामगारांसाठी आवश्यक सुरक्षा उपायांमध्ये, हेल्मेट, हर्नेस व संरक्षक जाळी न लावल्यामुळे हा अपघात घडला. आरोपी अद्याप अटकेत नाही.

फिर्यादी पोलिस उपनिरीक्षक कुमार कोडीबा गिरीगसावी यांनी आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम कलम १०६(१) अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories