news
clock
शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन गुंतवणुकीत ७५ लाख ५० हजारांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन गुंतवणुकीत ७५ लाख ५० हजारांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन गुंतवणुकीत ७५ लाख ५० हजारांची फसवणूक 

पिंपरी, ता. ८ - शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल ७५ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मंगळवारी (ता. ७) सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत काही मोबाईलक्रमांकधारक, बॅंक खातेधारक व लिंकधारक आरोपी आहेत. ५ नोव्हेंबर २०२५ ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत ताथवडे येथील अझुरे डेकॅथलॉन रोड परिसरात राहणाऱ्या फिर्यादीला अज्ञात मोबाईल क्रमांकावरुन संपर्क साधण्यात आला. आरोपींनी स्वतःला नामांकित गुंतवणूक कंपनीचे सल्लागार असल्याचे भासवून शेअर मार्केट व आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगितले.

यानंतर फिर्यादीला एका लिंकद्वारे व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करुन घेण्यात आले. काही ग्रुपमध्ये आरोपींनी विविध गुंतवणूक सल्ले देत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. बनावट कागदपत्रे, शिक्के व नोंदणी क्रमांक दाखवून गुंतवणुकीसाठी विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास भाग पाडले.

फिर्यादीने टप्प्याटप्प्याने एकूण ७५ लाख ५० हजार रुपये जमा केले. मात्र, नफा किंवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर ७ एप्रिल २०२६ रोजी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories