news
clock
लोखंडी स्टॅण्ड डोक्यात घालून पत्नीला केले जखमी, पतीला अटक

लोखंडी स्टॅण्ड डोक्यात घालून पत्नीला केले जखमी, पतीला अटक

लोखंडी स्टॅण्ड डोक्यात घालून पत्नीला केले जखमी, पतीला अटक 

पिंपरी, ता. ८ - घरातील वादातून पतीने पत्नीला गॅस शेगडीचे लोखंडी स्टॅण्ड डोक्यात मारुन जखमी केले. हा प्रकार पवारनगर कॉलनी-थेरगाव येथे सोमवारी (ता. ६) घडला आहे. पोलिसांनी पतीला अटक केली असून मंगळवारी (ता. ७) पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

या प्रकरणी पत्नीने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधित महिलेचा पती आरोपी किशोर सुभाष वाघमारे (वय ३५) हा घटनेच्या वेळी तो दारुच्या नशेत होता. घरातील पेंटिंग ब्रश कचऱ्यात का टाकला यावरुन वाद झाला. त्यातून संतापलेल्या आरोपीने घरातील गॅस शेगडीवरील लोखंडी स्टँड महिलेच्या डोक्यात मारुन तिला गंभीर जखमी केले.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला अटक केली आहे. आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories