कर्ज मंजुरीचे आश्वासन देऊन व्यावसायिकाची २,८५,०००/- रुपयांची फसवणूक
पिंपरी, ता. २८ - कर्ज मंजुरीचे आश्वासन देऊन एका इसमाने एका व्यावसायिकाची २,८५,०००/- रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना ५ जुलै २०२३ ते २५ जून २०२५ या कालवधीत कमा क्रॉस बिल्डींग-पिंपरी येथे घडली. आरोपीविरोधात शुक्रवारी (ता. २७) पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूकीला बळी पडलेले किरण भालचंद्र सुर्यवंशी (वय ४८ वर्षे, रा. निगडी) यांनी तक्रार दिली.
आरोपी गणेश एकनाथ सुर्यवंशी (रा. पिंपळे गुरव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ जुलै २०२३ ते २५ जून २०२५ या कालवधीत आरोपीने आठ दिवसात जन विकास कम्युनिटी प्रा. लि. या बँकेकडून ५०,०००,००/- रुपये मालमत्ता तारण कर्ज काढून देतो असे आश्वासन फिर्यादी किरण यांन दिले.
कर्ज प्रकरण मंजूर करण्याच्या नावाखाली वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीकडून वेळोवेळी ३,५५,०००/- रुपये घेतले व कोणतेही कर्ज मंजुर न करता फिर्यादीने दिलेल्या रकमेपैकी फक्त ७०,०००/- रुपये परत करुन उर्वरित २,८५,०००/- रुपये परत न देता फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली आहे. हे पैसे फिर्यादीला परत करण्याबाबत आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली व शिवीगाळ करुन उर्वरित पैसे मागितल्यास जिवे मारुन टाकीन अशी धमकी दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपीविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम ३१८ (४), ३५२,३५१ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.