दगडूशेठ मंदिर परिसरातून मोटारीतून मोबाईल चोरी

दगडूशेठ मंदिर परिसरातून मोटारीतून मोबाईल चोरी

दगडूशेठ मंदिर परिसरातून मोटारीतून मोबाईल चोरी

पिंपरी, ता. २० -  श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात दर्शनासाठी थांबलेल्या एका मोटारीमधून एक लाख रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली. गर्दीचा फायदा घेत दोघांनी ही चोरी केल्याचे समोर आले आहे.

फिर्यादी (वय ५१, रा. शिवाजीनगर) हे रस्त्याने जात असताना त्यांनी दर्शनासाठी मंदिरासमोर मोटारीचा वेग कमी केला. त्यावेळी दोन व्यक्तींनी वाद घालत त्यांचे लक्ष विचलित केले आणि त्याच वेळी मोटारीमधील मोबाईल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories