news
clock
शिवजयंतीनिमित्त लोणावळ्यामध्ये 'दर्यापती शिवराय' प्रदर्शन, १९ व २० फेब्रुवारीला आयोजन

शिवजयंतीनिमित्त लोणावळ्यामध्ये 'दर्यापती शिवराय' प्रदर्शन, १९ व २० फेब्रुवारीला आयोजन

शिवजयंतीनिमित्त लोणावळ्यामध्ये 'दर्यापती शिवराय' प्रदर्शन, १९ व २० फेब्रुवारीला आयोजन 

पिंपरी, ता. १८ - शिवजयंतीनिमित्त जय हिंद लोक चळवळ यांच्या वतीने लोणावळ्यामध्ये 'दर्यापती शिवराय' प्रदर्शनाचे आयोजन १९ व २० फेब्रुवारीला करण्यात आले आहे. मराठा आरमार व युद्धनौकांचे प्रदर्शन, शिवकालीन सागरी किल्ल्यांची आकर्षक छायाचित्रे यांचा या उपक्रमात समावेश असणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक व नगरसेवक निखिल कविश्वर यांनी दिली.

लोणावळा नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, शाळा क्र. एक येथे गुरुवार (ता. १९) ते शुक्रवारी (ता. २०) सकाळी ११ ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले असेल. छत्रपती शिवाजी महाराजांना 'भारतीय नौसेनेचे जनक' म्हणून गौरविले जाते. त्यांच्या अद्वितीय आरमार बांधणाची आणि समुद्री सामर्थ्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, हा प्रदर्शनाचा उद्देश आहे. 

प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते होणार आहे. नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे व उपनगराध्यक्ष देवदास कडू यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.  सर्व पक्षीय पदाधिकारी, नगरसेवक व नागरिकही यावेळी उपस्थित असतील. नागरिकांनी आपल्या पाल्यांसहित आवर्जून हे प्रेरणादायी प्रदर्शन पाहण्यासाठी यावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories