बांधकाम साहित्याची ऑर्डर न दिल्याच्या कारणावरून मागितली एक लाख रुपयांची खंडणी, चौघांना अटक

बांधकाम साहित्याची ऑर्डर न दिल्याच्या कारणावरून मागितली एक लाख रुपयांची खंडणी, चौघांना अटक

बांधकाम साहित्याची ऑर्डर न दिल्याच्या कारणावरून मागितली एक लाख रुपयांची खंडणी, चौघांना अटक

पिंपरी, ता. 19 - बांधकाम साइटवर साहित्य पुरवण्याचे काम मला का दिले नाही या कारणावरून चार जणांच्या टोळक्याने एका इसमास त्याच्या कंपनीत घुसून धमकावले आणि  जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडून एक लाख रुपयांची खंडणी मागितली. हा प्रकार हिंजवडी येथील रासझींग स्पेसेस कंपनीच्या ऑफिसमध्ये सोमवारी (ता.‌ 18) दुपारी घडला आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत, अनिल शिवाजीराव अंभुरे (वय ३०) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय अर्जुन ठाकर, चेतन ओव्हाळ, सुशांत भालेकर आणि संदीप देशभ्रतार यांना दुपारी सुमारे १.३० वा. ब्रोझ कार  मधून येवून अनाधिकृतपणे अंकुरे यांच्या कार्यालयात  केबिनमध्ये प्रवेश केला.

अंभुरे यांना  आरोपी म्हणाले की, “माण साईटवर लागणारे बांधकाम साहित्य पुरविण्याचे काम मला का दिले नाही? माझेकडून साहित्य खरेदी का केले नाही? तुमच्यामुळे माझा मोठा लॉस झाला आहे. मला आत्ताच्या आत्ता १ लाख रुपये द्या नाहीतर तुला जीवंत सोडणार नाही, गाडीत हत्यार ठेवले आहे”.

पोलिसांनी आरोपींवर हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय सहिता कलम ३०८ (४), ३३३, ३(५) तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट क. ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories