डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनवरील हस्ताक्षराचा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट

पुणे, ता. २ - विधानभेत अधिवेशनादरम्यान डॉक्टरांनी लिहिलेल्या हस्ताक्षराची गुणवत्ता आणि सुवाच्यता हा मुद्दा  उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना, डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनवरील हस्ताक्षराचा विषय आता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल. डॉक्टरांसाठी स्पष्ट आणि सुवाच्य हस्ताक्षर का आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जाईल, असे लेखी उत्तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. 

राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान आयोगाने वैद्यकीय महाविद्यालयांना डिसेंबर २०२५ मध्ये प्रिस्क्रिप्शन प्रणालीचा आढावा आणि देखरेख करण्यासाठी एक उपसमिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. ही समिती अचूक प्रिस्क्रिप्शन आणि स्पष्ट प्रिस्क्रिप्शन सुनिश्चित करण्यासाठी काम करेल. राज्य "नेक्स्ट जेन ई-हॉस्पिटल" ही एक नवीन आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणाली देखील राबवत आहे. ही डिजिटल प्रणाली प्रिस्क्रिप्शन आणि रुग्णांच्या नोंदी सुलभ करण्यास मदत करत आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance