शहरातील सर्व नालेसफाईची कामे वेळेत, नियोजनबद्ध व गुणवत्तेने पूर्ण करावीत, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रशासनाला निर्देश
शहरातील सर्व नालेसफाईची कामे वेळेत, नियोजनबद्ध व गुणवत्तेने पूर्ण करावीत, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रशासनाला निर्देश
पिंपरी, ता. १३ - ''शहरात ठिकठिकाणी पावसाळ्यात पाणी साचणे, नाले तुंबणे किंवा पूरस्थिती निर्माण होणे या घटना स टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी अधिक सजग आणि सक्षम राहणे आवश्यक आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन नागरिकांना दिलासा देणे हे प्रशासनाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. त्यामुळे, आगामी पावसाळा लक्षात घेऊन शहरातील सर्व नालेसफाईची कामे वेळेत, नियोजनबद्ध आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत.'', असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यावेळी, आरोग्य विभागाने सादर केली. त्यानुसार, शहरातील एकूण १४५ नाले आणि सुमारे ९४ हजार ९१३ मीटर लांबीच्या नाल्यांची साफसफाई सुरु आहे. यापैकी आतापर्यंत ४७.३४ टक्के काम पूर्ण झाले असून मार्च महिन्याच्या तुलनेत प्रगतीत लक्षणीय वाढ झालेली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवनामध्ये नुकतीच आरोग्य विभागाची आढावा बैठक आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंबासे, सह शहर अभियंता बापू गायकवाड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह अभियंता बापू गायकवाड, अनिल भालसाखळे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सचिन पवार, अण्णा बोदडे, पंकज पाटील, व्यंकटेश दुर्वास, सीताराम बहुरे, नगर सचिव मुकेश कोळप, सहायक आयुक्त तानाजी नरळे, अमित पंडित, किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, राजाराम सलगर, निवेदिता घार्गे, पूजा दूधनाळे, अतुल पाटील, राजाराम सलगर, किशोर ननवरे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ''नाल्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत बांधकामांमुळे शहरात पाणी साचण्याची समस्या गंभीर बनते. त्यामुळे अशा बांधकामांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही.'' या अनधिकृत बांधकामांवर त्वरीत कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी संबंधित विभागांना तातयासह अनधिकृत नळजोड, ओव्हरहेड वायर, पदपथावरील अतिक्रमण, शहर विद्रूप करणारे होर्डिंग, बॅनर व जाहिराती यांच्यावरही कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले.''यावेळी, पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन, उन्हाळ्यात नागरिकांना आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधांची उपलब्धता याबाबत सखोल आढावा घेण्यात आला.
स्वच्छ सर्वेक्षणाचा आढावा....
या बैठकीत आयुक्तांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२६ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचाही आढावा घेतला. यात झिरो वेस्ट स्लम, झिरो वेस्ट स्कूल, आर.आर.आर. सेंटर या उपक्रमांद्वारे शहर अधिक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती देण्यात आली. आनंदनगर येथील ‘शून्य कचरा’ प्रकल्पाचे आयुक्तांनी विशेष कौतुक केले. अशा उपक्रमांचा विस्तार शहरातील इतर भागांमध्येही करावा असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.