महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी कुलदीप जंगम यांची नियुक्ती

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी कुलदीप जंगम यांची नियुक्ती

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी कुलदीप जंगम यांची नियुक्ती 

पिंपरी, ता. १६ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी कुलदीप जंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी (ता. १६) जारी केला आहे. विद्यमान अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोरोटे यांची मंत्रालयात नगरविकास विभागात बदली झाली आहे.

सदर आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोरोटे यांना आज गुरुवारपासून कार्यमुक्त करण्यात येत आहे. शासनाच्या नगरविकास विभागाच्या फेब्रुवारी २०२६ च्य निर्णयानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील  अतिरिक्त आयुक्तांच्या ३ पदांपैकी १ पद भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, कुलदीप जंगम यांची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

कुलदीप जंगम हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या सन २०२० च्या तुकडीतील अधिकारी आहेत. बी. टेक ही पदवी त्यांनी प्राप्त केली केला. कुलदीप जंगम यांनी यापूर्वी ३० ऑगस्ट २०२४ ते  एप्रिल २०२६ पर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची धुरा सांभाळली आहे. ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीही होते. त्याआधी वाशिम येथे सहायक जिल्हाधिकारी, सिल्लोड, संभाजीनगर येथे सहायक जिल्हाधिकारी, गुजरात पोलीस विभागात अहमदाबाद ग्रामीण सहायक पोलीस अधीक्षक या जबाबदाऱ्या कुलदीप जंगम यांनी सांभाळल्या आहेत. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories