माणसाला माणूस म्हणून जगू देणे, हेच संतांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ विचार; किर्तनकार ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज यांचे प्रतिपादन
माणसाला माणूस म्हणून जगू देणे, हेच संतांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ विचार; किर्तनकार ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज यांचे प्रतिपादन
विठ्ठलनगर-पिंपरी येथे भीमजयंतीनिमित्त ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज यांचे प्रबोधनात्मक कीर्तन
पिंपरी, ता. २१ - "माणसांपेक्षा दगडांना जास्त महत्त्व देणारा समाज वाढू लागल्याने खऱ्या वारकरी विचारांचा पराजय होत आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे समता, शांती, बंधुता आणि न्याय आहे. माणसाला माणूस म्हणून जगू देणे, हेच संतांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ विचार होते असे प्रतिपादन प्रबोधनकार ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज यांनी केले.विठ्ठलनगर पुनर्वसन, पिंपरी येथे सम्यक स्वयंसेवा संस्थेच्या वतीने आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंती महोत्सवात ते (दि.१९)बोलत होते.या कार्यक्रमाचे आयोजन सम्यक स्वयं सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ बनसोडे, सदस्य ललिता बनसोडे,सिद्धांत बनसोडे, ज्योती बनसोडे ,कौसल्या पंडित यांनी केले होते.
यावेळी नगरसेवक राहुल भाऊ भोसले, नगरसेविका वैशालीताई घोडेकर (लोंढे), जेष्ठ पत्रकार नाना कांबळे , जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, साम टीव्हीचे प्रतिनिधी पत्रकार गोपाल मोटघरे, सुनील उर्फ बाबू कांबळे, प्रविण शिर्के,रोहित खरगे, अविनाश कांबीकर, माऊली भोसले, युनूस खतीब, विकास गायकांबळे, देवा भालके, भीमराव बरकडे, सोमनाथ काळे, मुख्याध्यापक आल्हाट, अभिमान सोनवणे, युवराज भास्कर,सैलाजात चौधरी, उर्वशी गाढवे आदींची प्रमुख उपस्थिती लाभली.
कीर्तनादरम्यान बोलताना प्रबोधनकार वाबळे महाराज म्हणाले की, महाराष्ट्राला मोठी वैचारिक परंपरा लाभली आहे. महात्मा फुले हे जगद्गुरु तुकोबारायांच्या वाटेवरून गेले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुल्यांच्या विचारांच्या वाटेवरून चालले. छत्रपती शिवाजी महाराजांनीही तुकोबारायांच्या विचारांचा वारसा जपत परकीय शाह्यांचा पाडाव केला आणि इथल्या बहुजन, तेली-तांबोळी, कुणबी समाजाला स्वराज्य मिळवून दिले.ज्ञानेश्वरांनी वेदांवर भाष्य न लिहिता गीतेवर ज्ञानेश्वरी लिहिली, कारण गीता त्यांना तथागत गौतम बुद्धांच्या धम्मपदासारखी वाटली. ज्ञानेश्वरीने समाजाला अहंकार आणि क्रोधापासून दूर राहून समता शिकवली. "तु मन हे मीचि करी, माझिये भजनीं प्रेम धरी" या ओवीचा अर्थ सांगताना 'भजन' म्हणजे केवळ टाळ वाजवणे नसून 'सेवा' करणे हा आहे, असे त्यांनी सांगितले.
बाबासाहेब विलायतला गेले पण कधी तंबाखू, पानाच्या व्यसनाला शिवले नाही. त्यांचे आचरण शुद्ध होते म्हणूनच समाज सुधारला. ज्याचे आचरण शुद्ध नाही, त्याचा परमार्थ, राजकारण किंवा समाजकारण काहीच शुद्ध असू शकत नाही.जे पंचशीलाचे पालन करतात, तेच खरे धम्माचे लोक आहेत आणि तेच खरे वारकरी आहेत.महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक शोषित आणि सामान्य माणूस हा एकाच मातीचा आहे, ही समतेची भावना संत तुकाराम महाराजांनी रुजवली.आज चालत्या-बोलत्या माणसाला पाण्यासाठी ताटकळत उभे केले जाते, मात्र दगडाच्या देवावर अडीच-अडीच लीटर दूध-दही ओतले जाते. देव दगडात, मूर्तीत किंवा तीर्थात नसून तो माणसाच्या सत्य आचरणात आणि चांगल्या चरित्रात असतो.संत नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये जाऊन शीख बांधवांना जोडण्याचे काम केले आणि 'गुरु ग्रंथ साहिब'मध्ये स्थान मिळवले, हा इतिहास सांगत वारकरी संप्रदाय समाज जोडणारा आहे, तोडणारा नाही, हा संदेश वाबळे महाराजांनी दिला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केले होते. परंतु जेव्हा मला जातीभेद जाणवला तेव्हा मी त्यातून बाहेर पडून चळवळीमध्ये सामील होऊन समाज हितासाठी काम करू लागलो. हा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम नक्कीच समाजाला दिशादर्शकठरेल असे मत मारुती भापकर यांनी व्यक्त केले.
यावेळी राईबाई वाघमारे, मस्के मामी ,रानुबाई किसन डोंगरे, शिलाबाई अभिमान सोनवणे, मंदा वाळके, आशावर्कर मिराताई वाघमारे, सुवर्णा कांबळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला ललिता बनसोडे, ज्योती बनसोडे, सिद्धांत बनसोडे, कौसल्या पंडित, अशोक शिखरे, माऊली बोराटे, सिद्धार्थ वंसाळे ,रमेश कांबळे ,दत्ताभाऊ गायकवाड ,दिलीप पवार, सुरज गायकवाड,राहुल सोनवणे, लक्ष्मण जोगदंड, मुकुंद रणदिवे, प्रदीप टोपे , बी बी शिंदे, अशोक गायसमुद्रे, धुराजी शिंदे, दीपक भालेराव, सुधाकर इंगळे, रोहिदास वाघमारे, अशोक वाघमारे, रामभाऊ ठोके, गोविंद गाडे ,राजा नायक ,सामाजिक कार्यकर्ते सुनिता पाटोळे तसेच स्वप्न रुपी महिला बचत गट- विद्या जालिंदर खरात ,आयुष्य महिला बचत गट- सुवर्णा लखन काकडे,आई महिला बचत गट -अध्यक्ष गवळण अशोक शिखरे, सम्राट महिला बचत गट -स्नेहलता पाटोळे , ममता महिला बचत गट -ज्योती शिंदे ,आदिती महिला बचत गट -पूजा अशोक डोंगरे(पाटोळे), श्रद्धा महिला बचत गट -प्रवीण पठाण, तनिष्का महिला बचत गट- सारिका गायकवाड , खुशी महिला बचत गट -राणी हजारे (पाटोळे),भिमाई महिला बचत गट, रमाई महिला बचत गट, सावित्री महिला बचत गट ,गौतमी महिला बचत गट ,यशोधरा महिला बचत गट ,अहिल्या महिला बचत गट ,द्वारकाबाई महिला बचत गट आदी बचत गट व नागरिक उपस्थित होते.