जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, सहा जणांना नोटीस
पिंपरी, ता. २२ - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट - २ च्या पथकाने शनिवारी (ता. २१) रात्री ८ च्या सुमारास पवारनगर थेरगाव येथील चाळीत जुगार खेळणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांना भारतीय न्याय संहिता कलम ३५ (३) प्रमाणे नोटीस दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार माहितीप्रमाणे, आरोपी “तीन पत्ती” नावाचा पत्यांचा जुगार खेळत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून ५,१७०/- रुपये रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त केले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे
१) शैलेश मेदनीकांत शर्मा, वय ४० वर्ष, रा. रसिकवाडी जांबे ता मुळशी जि पुणे
२) अशोक सोनाजी वडमारे, वय ६५ वर्षे, रा. पवारनगर काळेवाडी फाटा थेरगाव पुणे
३) संजय मच्छिंद्र मिसाळ, वय ४५ वर्षे, रा. म्हातोबानगर
४) शकुर नझीर हवालदार, वय ३६ वर्षे, रा. माने शाळे तापकिरमळा काळेवाडी पुणे
५) अक्रम दिलदार खान वय ५५ वर्षे रा. ड्रायव्हर कॉलनी काळेवाडी फाटा थेरगाव पुणे
६) दुर्गाराम रुपाराम पटेल रा. रुम नं.५, पवार यांचे भाड्याचे खोलीत, सुर्यमुखी गणेश मंदिराजवळ, पवारनगर