news
clock
यशस्वी उद्योजक हे राष्ट्राचे भाग्यविधाते - पद्मश्री गिरीश प्रभुणे

यशस्वी उद्योजक हे राष्ट्राचे भाग्यविधाते - पद्मश्री गिरीश प्रभुणे

यशस्वी उद्योजक हे राष्ट्राचे भाग्यविधाते - पद्मश्री गिरीश प्रभुणे 

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या वतीने चिंचवडमध्ये उद्योगरत्न पुरस्कारांचे वितरण   

पिंपरी, ता. १७ - महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या वतीने भारतरत्न जेआरडी टाटा उद्योगरत्न पुरस्कार आणि उद्योगमहर्षी रतन टाटा पुरस्कार व उद्योग क्षेत्रातील इतर पुरस्कार वितरण समारंभ ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते नुकताच चिंचवडमध्ये पार पडला. ''यशस्वी उद्योजक हे केवळ  महाराष्ट्राचेच नव्हे राष्ट्राचे भाग्यविधाते आहेत.'', असे गौरवोद्‌गार प्रभुणे यांनी काढले. 

चिंचवड येथील ऑटोक्लस्टर ऑडिटोरियममध्ये हा कार्यक्रम झाला. आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची  प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात, भरत गीते यांना जेआरडी टाटा उद्योगरत्न पुरस्काराने, संदीप शिंदे यांना उद्योगरत्न पुरस्काराने, सुधीर भांदुर्गा यांना उद्योगमहर्षी पुरस्काराने, डॉ. गणेश घंगाळे यांना उद्योगभूषण पुरस्काराने, गणेश राऊत यांना उद्योगभूषण पुरस्काराने आणि रेश्मा मुल्ला यांना उद्योगसखी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

यावेळी, श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी एकविसाव्या शतकातील उद्योजक' या विषयावर व्याख्यान दिले. सुदाम भोरे यांनी प्रास्ताविक केले. पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थींशी संवाद साधून त्यांची वाटचाल श्रोत्यांसमोर उलगडली. अरुण गराडे, प्रा. डॉ. संभाजी मलघे, महेंद्र भारती, सुप्रिया सोळांकुरे, राजेंद्र वाघ, प्रभाकर वाघोले, प्रतिमा काळे, इंद्रजित पाटोळे, राजू जाधव, प्रा. प्रभाकर दाभाडे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजन केले.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories