शासनाच्या विविध योजनांचा आणि महसूल विभागाच्या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन.....

शासनाच्या विविध योजनांचा आणि महसूल विभागाच्या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन.....

शासनाच्या विविध योजनांचा आणि महसूल विभागाच्या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन..... 

पिंपरी, ता. २१ जुलै २०२६ - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार शंकर जगताप यांच्यातर्फे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' आयोजित केले आहे. या विशेष शिबिरात शासनाच्या विविध योजनांचा आणि महसूल विभागाच्या सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे.

हे शिबिर बुधवारी (ता. २२) स. १०.३० ते सायं. ५.३० वाजेपर्यंत वाल्हेकरवाडी-चिंचवड येथील आहेर गार्डन मंगल कार्यालयात होणार आहेत.  नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.  

🟧 या शिबिरात मिळणाऱ्या लाभ मिळणाऱ्या प्रमुख योजनांचा लाभ -

- राज्यातील महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र वाटप

- गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप

- मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना

- शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे

- तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक क्षेत्र घोषणा

- जिवंत सातबारा मोहीम

- राज्यातील सिंधी विस्थापितांच्या निवासी व वाणिज्यिक जमिनी फ्री होल्ड करण्यासाठी विशेष अभय योजना-२०२५ ला एक वर्ष मुदतवाढ

- राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना

- घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद

- कुंभार समाजातील व्यक्तींना पारंपरिक व्यवसायासाठी सवलती

- शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ


🟧 या शिबिरात उपलब्ध असणाऱ्या कागदपत्रांच्या सेवा

- चालू व मागील ३ वर्षांचा उत्पन्न दाखला

- वय, राष्ट्रीयत्व व अधिवास दाखला

- आर्थिक दुर्बल घटकांचे (EWS) प्रमाणपत्र

- नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र

- जातीचा दाखला (सन १९५० व १९६७ पासून वास्तव्य/पुरावा असलेले)

- सर्व प्रकारची प्रतिज्ञापत्रे

- ऑनलाईन ७/पर उतारा

- फेरफार उतारा

- आधार कार्ड (नवीन / दुरुस्ती / अद्ययावत)

- मयत खातेदारांच्या वारसनोंदी

- ७/१२ उताऱ्यावर खरेदी / बैंक बोजा इत्यादी नोंदी

- संजय गांधी विधवा निराधार अनुदान योजना

- श्रवणबाळ ज्येष्ठ नागरिक अनुदान योजना

- इतर विविध महसूल सेवा व शासकीय सुविधांचा लाभ

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories