दिल्लीतील आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने देशभरात संतापाची भावना
पिंपरी, ता. २१ जुलै २०२६ - देशातील शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि 'नीट' परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये जंतरमंतर मैदानावर 'कॉकरोच जनता पार्टी' आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान चलो संसद मोर्चा सुरु असताना सोमवारी (ता. २०) दिल्ली पोलिस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सने लाठीचार्ज केला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यामुळे या लाठीचार्जवर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. सरकारचा निषेध केला जात आहे.
रात्री उशीरपर्यंत जंतरमंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. संसद मोर्चानंतर अभिजीत दीपकेंसह आंदोलक रात्री पुन्हा जंतर मंतरवर परतले. त्यावेळी पोलिसांचा फौजफाटाही जंतर मंतरवर होता. अभिजीत दीपकेंसह आंदोलकांसमोरून पोलिस जात असताना आंदोलकांनी संतापाने टाळ्या वाजवून पोलिसांचे अभिनंदन केले. आंदोलकांवर खूप चांगला लाठीमार केलात, योग्य पद्धतीने लाठीमार केल्याबद्दल धन्यवाद अशा शब्दात अभिजीत दीपकेनं आभार मानले.
त्यानंतर, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी लाठीमारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी उपचारांची माहिती घेतली आणि आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे देशभरात संतापाची भावना आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आरएमएल रुग्णालयात जखमी विद्यार्थ्यांच्या भेटीला निघाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत विद्यार्थ्यांच्या भेटीला निघाले आहेत.
- Rapid Action Force, RAF, दिल्ली पोलिस, Delhi Police, आंदोलक जखमी, Injured Protesters, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज, Lathi Charge On Students
- चलो संसद मोर्चा, Chalo Sansad March, कॉकरोच जनता पार्टी, Cockroach Janta Party
- नीट पेपरफुटी, NEET Paper Leak, NEET Exam Scam, धर्मेंद्र प्रधान राजीनामा, Dharmendra Pradhan Resignation
- विद्यार्थी आंदोलन, Student Protest
- दिल्ली लाठीचार्ज, Delhi Police Lathi Charge
- जंतरमंतर आंदोलन, Jantar Mantar Protest