पिंपरी-चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार, महापारेषण व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक

पिंपरी-चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार, महापारेषण व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक

पिंपरी-चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार, महापारेषण व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक 

पिंपरी, ता. ३१ जुलै २०२६ -  पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, वाढणारी वीजेची मागणी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आमदार शंकर जगताप यांनी शुक्रवारी (ता. ३१) महावितरणच्या 'प्रकाश भवन' कार्यालयात महापारेषण व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत शहरातील वीज प्रश्नांवर  सविस्तर आढावा बैठक घेतली. या बैठकीत शहरातील वीजविषयक प्रलंबित कामांना गती देण्यासाठी कालबद्ध, परिणामकारक आणि भविष्यवेधी नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

या बैठकीत पाषाण–सांगवी वीजवाहिनीचे काम पुढील सहा महिन्यांत सुरू करण्याचे, यशदा परिसरात नवीन वीज उपकेंद्र उभारण्याचे तसेच गहुंजे येथे २२०/२२ केव्ही, ३०० एमव्हीए क्षमतेच्या अतिउच्चदाब उपकेंद्राच्या प्रस्तावाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. यांसह २०५१ पर्यंतची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन नवीन सबस्टेशन, ट्रान्सफॉर्मर आणि वीज पायाभूत सुविधांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याच्या सूचनाही आमदार जगताप यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. महत्वाचे म्हणजे पिंपरी-चिंचवड, राजगुरुनगर, लोणावळासह नवीन वीज परिमंडळाचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून, यामुळे शहराला स्वतंत्र वीज परिमंडळ मिळून प्रशासकीय कामांना मोठी गती मिळणार आहे. तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे जलद गतीने निवारण होण्यासही मदत होणार आहे.

याशिवाय रावेत, पुनावळे, किवळे, ताथवडे, सांगवी आणि नवी सांगवी या वेगाने विकसित होणाऱ्या भागांतील वाढती वीज मागणी लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे, पूरप्रवण भागांतील ट्रान्सफॉर्मर व वीजयंत्रणा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे, भूमिगत वीजवाहिन्यांचे संरक्षण, विद्युत सुरक्षाविषयक उपाययोजना, नियमित ग्राहक मेळावे आणि मतदारसंघनिहाय वीज वितरण सनियंत्रण समित्या स्थापन करण्याचेही निर्देश देण्यात आले.

याबाबत, आमदार जगताप म्हणाले की, ''महापारेषण, महावितरण, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए यांच्या समन्वयातून पिंपरी-चिंचवड शहर पूर्णपणे लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी कालबद्ध पद्धतीने कार्यवाहीसाठी तत्पर राहू. विजेच्या वाढत्या मागणीचा विचार करून भविष्यातील गरजांनुसार वीजयंत्रणेची क्षमता वाढवणे, नवीन सबस्टेशन उभारणे आणि प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावणे, हेच माझे प्राधान्य आहे.''


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories