लोकवर्गणीतून साकारलीये सुंदर शाळा, जावळी तालुक्यातील महिगावमधील ग्रामस्थांचा उपक्रम

पुणे, ता. २७ - सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील महिगावमधील ग्रामस्थांनी एकत्र येत अनुकरणीय काम केले आहे... ते म्हणजे  लोकवर्गणीतून देखणी शाळा उभारली आहे. ही शाळा जिल्हा परिषद केंद्र शाळा आहे. पाहताक्षणी ही शाळा सर्वांचेच मन प्रसन्न करते. ग्रामस्थांनी स्वतः स्वच्छता मोहिम राबवून शाळेचा परिसर स्वच्छ-सुंदर केला आहे.

या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या इमारतीसाठी आणि सुशोभीकरणासाठी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने लोकवर्गणी गोळा केली. जमा झालेल्या निधीतून शाळेच्या भिंती दुरुस्त केल्या आणि या भिंतींवर इतिहासातील थोर व्यक्ती, देशाविषयीची चित्रे, गणित-विज्ञानातील संकल्पना, पर्यावरण संरक्षणाचे संदेश, स्वच्छतेचे महत्त्व अशी  चित्रे रेखाटण्यात आली आहे. या चित्रांमधून गणितातील पाढे, इंग्रजी शब्दसंग्रह, मराठी व्याकरणाचे नियम, नकाशे आणि विज्ञान विषयक माहिती सोप्या पद्धतीने समजते. 

तसेच यातून विद्यार्थ्यांचे मूल्यशिक्षण नित्यनियमाने होते आहे चित्रकार प्रदीप रणदिवे व किर्वे यांनी ही चित्रे चितारली आहेत.

शाळेचे मुख्याध्यापक रोहिदास भोसले शाळेबाबात बोलताना म्हणाले की, सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने या शाळेचा कायापालट झाला. शाळेची शैक्षणिक कामगिरी देखील चांगली आहे. त्यांच्यामुळे बाहेरगावची मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषद सदस्य जयश्री गिरी, सातारा पालिकेचे नगरसेवक विजय देसाई, मुख्याध्यापक रोहिदास भोसले, उपशिक्षक दीपक फरांदे, नामदेव जुनघरे, शंकर ओंबळे, श्रीमती कदम व शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष श्रीकांत मुसळे, सरपंच, उपसरपंच व गावातील अनेक दानशूर व्यक्ती तसेच नवरंग मंडळ यासाठी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance