news
clock
परतावा भूखंडांच्या वाटपावरुन सुरु असलेले वाकड ग्रामस्थांचे उपोषण मागे

परतावा भूखंडांच्या वाटपावरुन सुरु असलेले वाकड ग्रामस्थांचे उपोषण मागे

 परतावा भूखंडांच्या वाटपावरुन सुरु असलेले वाकड ग्रामस्थांचे उपोषण मागे 

पिंपरी, ता. २७ - वाकडमधील ग्रामस्थांनी पुकारलेले १२.५ टक्के परतावा भूखंडांच्या वाटपावरून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) प्रशासनाविरुद्धचे आंदोलन शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. २६) मागे घेतले. कायद्याच्या चौकटीतील मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र पीएमआरडीए प्रशासनाने दिल्यानंतर, महापौर रवी लांडगे आणि पीएमआरडीएच्या सहआयुक्त पूनम मेहता यांच्या हाताने सरबत घेऊन शेतकऱ्यांनी उपोषण सोडले. 

ज्ञानेश्वर कस्पटे, समीर कस्पटे आणि ग्रामस्थांनी वाकड येथील मूळ शेतकऱ्यांना डावलून बाहेरील व्यक्तींना भूखंड वाटप केल्याचा आरोप केला पीएमआरडीएवर केला होता आणि न्यायासाठी उपोषण सुरू केले होते. वाकडमधील जमिनींचा परतावा केवळ स्थानिक भूमिपुत्रांनाच मिळावा, ही आंदोलकांची मुख्य मागणी होती. बुधवारी (दि. २५) पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात  सकारात्मक चर्चा झाली. 

वाकड येथील शेतकरी ज्ञानेश्वर कस्पटे आणि इतर आंदोलकांना मागण्या मान्य केल्याबाबतचे पत्र देताना पीएमआरडीएच्या सहआयुक्त पूनम मेहता, महापौर रखी लांडगे, उपायुक्त हिम्मत खराडे,

महापौर रवी लांडगे, सहआयुक्त पूनम मेहता उपस्थित होते. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories