बुलेटमध्ये फेरफार केलेले एकूण ३९९ सायलेंसर वाहतूक शाखेकडून नष्ट  

पिंपरी, ता. २८ - पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने २४ ते २६ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवसांत शहरात सर्वत्र बुलेट सायलेंसर फेरफार करुन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबवली. कारवाईमध्ये पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडील १३ वाहतूक विभागाकडून बुलेट सायलेंसरमध्ये फेरफार केलेले एकूण ३९९ बुलेट सायलेंसर काढून घेण्यात आले व वाहतूक विभागात जमा करण्यात आले. जमा करण्यात आलेल्या बुलेट सायलेंसर शुक्रवारी (ता. २७) नष्ट करण्यात आले. सांगवी वाहतूक विभागाच्या  कार्यालयाजवळ ही कारवाई करण्यात आली.


पिंपरी-चिंचववड पोलीस आयुक्तालयांतर्गत नागरिकांच्या बुलेट सायलेंसरच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबाबत तक्रारी येतात. अशा नियमभंग करुन सायलेंसरमध्ये फेरफार करुन वाहन चालविणाऱ्या बुलेट वाहनांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येते. अशा नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर सन २०२५ मध्ये १४,५१२ प्रकरणांमध्ये (केसेस) १ कोटी ४४ लाख ९२ हजार रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे. जानेवारी २०२६ ते २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत १,८५३ प्रकरणांमध्ये १८ लाख ५३ हजार रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेने दिली आहे.

सदर कारवाई, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे,  पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखील, पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त विवेक पाटील, वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांच्यामार्फत करण्यात आली आहे, सदरची कारवाई यापुढेही सुरु राहील, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance