news
clock
बारावीच्या परीक्षेत राज्यभरात आतापर्यंत 'कॉपी'ची १०९ प्रकरणे समोर

बारावीच्या परीक्षेत राज्यभरात आतापर्यंत 'कॉपी'ची १०९ प्रकरणे समोर

बारावीच्या परीक्षेत राज्यभरात आतापर्यंत 'कॉपी'ची १०९ प्रकरणे समोर 

पुणे, ता. १९ - इयत्ता बारावीच्या परीक्षेदरम्यान राज्यभरात आतापर्यंत 'कॉपी'ची १०९ प्रकरणे समोर आली आहेत. सामूहिक कॉपीप्रकरणी आतापर्यंत ३१ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या अखत्यारीतील पाच आणि अमरावती विभागीय मंडळाच्या एका परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात सामूहिक कॉपीचे प्रकार झाले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे प्रमुख, राज्य मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे.

राज्यात बारावीची परीक्षा तीन हजार ३८७ मुख्य परीक्षा केंद्रांवर घेण्यात येत आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही अनिवार्य करण्यात आले आहेत. यातील जवळपास ९५ टक्के परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही आहेत, सीसीटीव्ही नसलेल्या १७२ परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदली केली आहे. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. 

 बीड (चौसाळा), छत्रपती संभाजीनगर (जैतापूर), वाशीम, जालना येथील सामूहिक कॉपी प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका त्या-त्या विभागीय मंडळात जमा केल्या आहेत. प्रत्येक उत्तरपत्रिकेची तपासणी करण्यात येणार आहे. उत्तरपत्रिकेत सारखेपणा आढळल्यास संबंधित विभागीय मंडळाचे अध्यक्ष त्याबाबत पुढील कार्यवाहीचा निर्णय घेतील, असे नंदकुमार बेडसे यांनी सांगितले.

परीक्षा केंद्रांवरील कारवाईचा तपशील -

१.  छत्रपती संभाजीनगर - बीड - कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, चौसाळा इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी वर्गामधील विद्यार्थी सामूहिक कॉपी करत असल्याचे आढळले. विद्यार्थ्यांना पर्यवेक्षक, केंद्र संचालक सहकार्य करत असल्याचे निदर्शनास आले. १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल. १७ पैकी ७ जणांचे निलंबन.

२. छत्रपती संभाजीनगर - राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर (ता. कन्नड) - इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी विद्यार्थी सामूहिक कॉपी करताना आढळले. विद्यार्थ्यांना पर्यवेक्षक, केंद्र संचालक सहकार्य करत आल्याचे दिसून आले. २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल. २४ पैकी १८ जणांचे निलंबन.

३. छत्रपती संभाजीनगर - जालना - जांबुवंत विद्यालय (रोहिलागड), प्रबोधनकार ठाकरे विद्यालय (शहागड), छत्रपती शिवाजीनगर विद्यालय (अंकुशनगर) - इंग्रजीच्या पेपरच्या वेळी विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले.  - पर्यवेक्षक म्हणून नियुक्त ६ शिक्षकांचे निलंबन, अन्य शिक्षक, खासगी शाळा कर्मचाऱ्यांवर निलंबनाचे संबंधित संस्थांना आदेश.

४. अमरावती - वाशीम - श्री. मैनागिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (टो-जुमडा): भौतिकशास्त्राच्या पेपरमध्ये सामूहिक कॉपी प्रकार आढळला. केंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केल्याचे दिसून आले. - २६ जणांवर गुन्हा दाखल. गुन्हा दाखल केलेल्यांना निलंबित करण्याचे आदेश.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories