news
clock
कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परताव्याच्या आमिषाने ९ लाखांचा अपहार

कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परताव्याच्या आमिषाने ९ लाखांचा अपहार

 कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परताव्याच्या आमिषाने ९ लाखांचा अपहार 

पिंपरी, ता. ३ - Captial Monks नावाच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवून एका इसमाची ९ लाख ७ हजार ५००/- रुपयांची फसवणूक झाली आहे. ही घटना डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात १ एप्रिलला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संबंधित पुरुषाने याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश पाटील नावाचा इसम, दोन महिला, एक लिंकधारक व विविध बॅंक खातेधारक या घटनेतील आरोपी आहेत. आरोपींनी फिर्यादी पुरुषाला व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून Captial Monks या कंपनीची माहिती दिली. गुंतवणुकीवर जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवले व अॅपची लिंक पाठवली. या लिंकवरुन Captial Monks अॅप डाऊलोड करण्यास भाग पाडले व  सदर अॅपवर वेगवेगळे खातेक्रमांक देत त्यावर ९,०७,५००/-रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे. 

सदरची रक्कमेचा परतावा व गुंतवणुक रक्कम अशी एकूण ९० लाख १५ हजार ८८७/- रुपये झाली असल्याचे अॅप मध्ये दाखवले. ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता सुरवातीला फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी २० हजार रुपये फिर्यादीच्या अकाऊंटवर पाठवले. नंतर सर्व रक्कम काढताना रक्कम निघाली नाही व त्यांच्या कोणत्याही व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क झाला नाही. त्यामुळे फिर्यादीची एकूण ९,०७,५००/-रुपयांची आर्थिक फसवणूक झाली. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories