ऑनलाईन गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याच्या आमिषाने ३७ लाख २५ हजारांची फसवणूक

ऑनलाईन गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याच्या आमिषाने ३७ लाख २५ हजारांची फसवणूक

ऑनलाईन गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याच्या आमिषाने ३७ लाख २५ हजारांची फसवणूक

पिंपरी, ता. १ - ऑनलाईन गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका इसमाची तब्बल ३७ लाख २५ हजार ७४१ रुपयांची फसवणूक झाली आहे. ही घटना १३ जानेवारी २०२६ ते २० मार्च २०२६ या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी मंगळवारी (ता. ३१) सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका पुरुषाने सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत काही मोबाईलनंबर धारक व वेबसाईट लिंकशी संबंधित व्यक्ती आरोपी आहेत.  फिर्यादी यांना इंस्टाग्रामवर “अॅक्सिस सिक्युरिटीज”च्या नावाने जाहिरात दिसली. त्या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर त्यांना “एल ६ अॅक्सिस सिक्युरिटीज” नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले.

या ग्रुपमधील आरोपींनी दर आठवड्याला ३० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर एका महिलेकडून व्हिडिओ कॉल करुन स्वतःचे नाव निलम धवन असे सांगत ती अॅक्सिस सिक्युरिटीजमधून बोलत असल्याचे सांगितले. आरोपींनी विविध मोबाईल नंबरद्वारे संपर्क साधून गुंतवणुकीसाठी वेगवेगळे बँक खाते क्रमांक पाठवले.

फिर्यादीकडून एकूण ३७ लाख २५ हजार ७४१ रुपये ऑनलाईन पद्धतीने दोन बनावट वेबसाईटवर गुंतवण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर भरलेली रक्कम व परतावा असे मिळून त्या वेबसाईटवर १,८१,५१,९९७ एवढी रक्कम दाखवली. ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता कमीशन फि भरण्यास सांगीतले ९,५१,११६ /- एवढी रक्कम कमीशन फि भरल्यानंतर, पुन्हा रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता ४,७५,५५८/-रुपये एवढा टॅक्स भरण्यास सांगीतला, टॅक्स भरल्यानंतर पुन्हा रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीला त्या महिलेने उडवाउडवीची उत्तरे दिली.  त्यानंतर फिर्यादीने पोलिसांत तक्रार करीन असे सांगीतल्यावर फिर्यादीस ग्रुपमधुन काढून टाकले. फिर्यादीचा विश्वासघात करुन ३७,२५,७४१/- रुपयांची ऑनलाईन आर्थीक फसवणुक केली आहे.

या प्रकरणी आरोपींविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२), ३(५), माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) तसेच भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories