news
clock
रविवारी काकडेपार्क-चिंचवड येथे अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

रविवारी काकडेपार्क-चिंचवड येथे अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

रविवारी काकडेपार्क-चिंचवड येथे अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

पिंपरी, ता. २७ - स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त जय मातृभूमी युवा मंचच्या सहकार्याने 'युवकांचे स्फूर्तीदाते : स्वातंत्र्यवीर सावरकर' या विषयावर  स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्यासक व अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 

सदर व्याख्यानाचा कार्यक्रम रविवारी (ता. १) सायंकाळी पाच वाजता काकडे पार्क येथील आठवडे बाजार मैदानात होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त जय मातृभूमी युवा मंचच्या सहकार्याने स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिन सप्ताह समारोपानिमित्त हे व्याख्यान होणार आहे. नागरीकांनी आवर्जून या हे व्याख्यान ऐकण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी आणि जय मातृभूमी युवा मंचाचे अनंत कोऱ्हाळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories