news
clock
फर्निचर व्यावसायिकाकडून ग्राहकाला मारहाण, ग्राहकाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर

फर्निचर व्यावसायिकाकडून ग्राहकाला मारहाण, ग्राहकाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर

फर्निचर व्यावसायिकाकडून ग्राहकाला मारहाण, ग्राहकाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर

पिंपरी, ता. २५ - 'मित्राचे फर्निचरचे काम वेळेत पूर्ण का केले नाही', याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी (ता. २३) काळेवाडीत घडला आहे. या मारहाणीत तरुणाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे व मंगळवारी (ता. २४) त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मारहाणीबाबत बजरंगलाल श्रीनिवास बंग (वय ३५, रा. रिचमंड पार्क सोसायटी, रहाटणी, पुणे) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बंग हे त्यांच्या मित्राच्या फर्निचरच्या कामाबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित दुकानात गेले होते. त्यावेळी आरोपी सलीम मुसा पंजेशा (वय ४४, रा. कृष्णा कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) याने फिर्यादीच्या नाकावर जोरात बुक्का मारून त्यांना दुखापत केली. या मारहाणीत फिर्यादीच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. आरोपीने त्यांना हाताबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. 

या प्रकरणी आरोपी सलीम मुसा पंजेशा याला पोलिसांनी अटक केली आहे. पंजेशा याच्यासह अन्य दोघांवर 

भारतीय न्याय संहिता कलम ११७(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories