news
clock
पुण्यात रस्ते आणि ड्रेनेजलाईनची, केबल डक्टची कामे एकत्र केली जाणार

पुण्यात रस्ते आणि ड्रेनेजलाईनची, केबल डक्टची कामे एकत्र केली जाणार

पुण्यात रस्ते आणि ड्रेनेजलाईनची, केबल डक्टची कामे एकत्र केली जाणार

पिंपरी, ता. २७ - पुणे महापालिकेमध्ये आता रस्त्यांची कामे करताना ड्रेनेज, पावसाळी गटारे लाईन आणि केबल डक्टची कामे एकत्रितपणे केली जाणार आहेत, अशी माहिती  पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी ही माहिती दिली. 

रस्त्यांची व त्याबाबत इतर कामे  करताना पथ विभाग आणि इतर विभागात समन्वय नसतो.  महापालिकेच्या पथविभागाकडून शहरात रस्ते विकसित केले जातात. मात्र, याच नव्या रस्त्यांवर ड्रेनेज, पावसाळी गटारे तयार करण्याच्यासाठी मलनिःसारण विभागाकडून तसेच इतर विभागाकडून रस्ते पुन्हा खोदले जातात.  परिणामी, नवे रस्ते अवघ्या काही दिवसांतच खड्डेमय होतात आणि यामध्ये करदात्या नागरीकांचे पैसे वाया जातात. 

म्हणून, आता आता रस्त्यांची कामे करताना ड्रेनेज, पावसाळी गटारे लाईन आणि केबल डक्टची कामे एकत्रितपणे केली जाणार आहेत, असे पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories