नाट्यलेखक राजन मोहाडीकर लिखित 'कर्मण्येवाधिकारस्ते' या पुस्तकाचे  रविवारी प्रकाशन

नाट्यलेखक राजन मोहाडीकर लिखित 'कर्मण्येवाधिकारस्ते' या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

नाट्यलेखक राजन मोहाडीकर लिखित 'कर्मण्येवाधिकारस्ते' या पुस्तकाचे  रविवारी प्रकाशन 

पिंपरी, ता. २७ -  नाट्यलेखक, निर्माते राजन मोहाडीकर लिखित 'कर्मण्येवाधिकारस्ते' या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (१ मार्च) मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश आमटे आणि  डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते होणार आहे. 

हे पुस्तक ज्येष्ठ उद्योगपती डॉ. लालासाहेब शिंदे यांच्या सफल जीवनावर आधारित आहे. पुस्तक प्रकाशन समारंभ पिंपरीतील हॉटेल कलासागर येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे. यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील अध्यक्षस्थानी असणार आहेत. 

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूकर, एल. व्ही. शिंदे ग्रुपचे कार्यकारी संचालक राजेंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती अनुबंध प्रकाशनचे संचालक अनिल कुलकर्णी यांनी दिली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories