news
clock
उन्हाळ्याच्या सुरवातीलाच लिंबू महागले

उन्हाळ्याच्या सुरवातीलाच लिंबू महागले

उन्हाळ्याच्या सुरवातीलाच लिंबू महागले

पिंपरी, ता. २३ - फेब्रुवारी अखेरीस सकाळपासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. लिंबूपाणी-लिंबूसरबताकडे सर्वांची पावले वळू लागली आहेत. त्यामुळे, बाजारात लिंबू महागले आहेत. किरकोळ बाजारात एक लिंबू दर्जानुसार ५ ते ७ रुपयांना मिळत आहे. घाऊक बाजारात दर्जानुसार एक गोणी ५०० ते १२०० रुपयांना विकली जात आहे. लिंबूंची आवक मागणीच्या तुलनेत कमी होत  आहे.

मार्केटयार्डात अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातून तसेच कर्नाटक राज्यातील विजयनगर भागातूनही लिंबांची आवक होत आहे. सध्या बाजारात एक ते दीड हजार गोणी लिंबाची आवक होत आहे. उत्पादित भागात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्याबरोबर आवक कमी होत जाण्याचा अंदाज आहे. गेला महिनाभरापासूनच लिंबांना मागणी वाढली आहे. त्यामुळे भावात प्रचंड वाढ झाली आहे. जूनपर्यंत हीच स्थिती कायम राहील, असे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories