तारण कर्जव्यवहारात पत्नीची पतीकडून फसवणूक

तारण कर्जव्यवहारात पत्नीची पतीकडून फसवणूक

तारण कर्जव्यवहारात पत्नीची पतीकडून फसवणूक 

पिंपरी, ता. २९ - पत्नीच्या वैयक्तिक कागदपत्रांचा गैरवापर करुन, पत्नीच्या खोट्या सह्या करुन तारण कर्ज घऊन पत्नीची फसवणूक केल्याची घटना सप्टेंबर २०२१ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत घडली आहे. याबाबत गुरुवारी (ता. २८) हिंजवडी पोलिस ठाण्यात आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत, पत्नीने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव संदेश शशीकांत आंब्रो असे आहे. आरोपी काळेवाडी परिसरात स्थायिक आहे. 

आरोपीने तारण कर्जासाठी आपल्या पत्नीचे लग्नापूर्वीचे  नाव वापरुन, तिच्या वैयक्तिक कागदपत्रांचा गैरवापर करुन, तिच्या खोट्या सह्या करुन हिंजवडीतील अॅक्सिस बॅंकेतून

४१ लाख २५ हजार ७८८ रुपयांचे तारण कर्ज घेतले. हे कर्ज आरोपीने 'फ्लॅट ३०१, बी-2 विंग, कृष्णा रेसिडन्सी काळेवाडी, जि.पुणे या प्रॉपर्टीवर तिघांचे नावावर' घेतले.  त्यात पत्नीला  सह-भागीदार केले.

 फिर्यादी पत्नीने आरोपी पतीला मला लोनमध्ये सहभागीदार का केले याबाबत विचारणा केली असता पतीने पत्नीला शिवीगाळ केली. या प्रकरणी आरोपी पतीवर हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता चे कलम. ४६५, ४६८, ४७१, ४२०,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories