लोणावळा लायन्स क्लबच्या पुढाकाराने आदिवासी समाजातील जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा
Mar 04 2026
59
लोणावळा लायन्स क्लबच्या पुढाकाराने आदिवासी समाजातील जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा
पिंपरी, ता. ३ - लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने आदिवासी समाजातील तीन जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात उत्साहात पार पडला.
ओळकाईवाडी येथील ओळकेश्वर मंदिर परिसरात झालेल्या या सोहळ्यास लायन्सचे प्रांतपाल राजेश अगरवाल, उमेश अगरवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या उपक्रमासाठी अध्यक्षा साधना टाटिया यांच्या नेतृत्वाखाली सेक्रेटरी सारिका अगरवाल व खजिनदार सुमित भडेशिया, डॉ. सीमा शिंदे यांच्यासह विजय मानकर, नवीन भुरट, गिरीश पारख, स्वरुप सूद, आनंद खंडेलवाल यांचे सहकार्य मिळाले.
"नवदांपत्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश आहे," अशी भावना यावेळी प्रांतपाल राजेश अगरवाल यांनी व्यक्त केली. नवविवाहित जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.