news
clock
गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त काव्यमैफल

गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त काव्यमैफल

गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त काव्यमैफल

पिंपरी, ता. ३ - गुणवंत कामगार कल्याण मंडळाचा सहावा वर्धापनदिन काव्यवाचन, व्याख्यान या विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. प्रदीप गांधलीकर, हेमंत जोशी, रेणुका हजारे, जयश्री श्रीखंडे, शोभा जोशी, नामदेव हुले, सतीश कांबळे, नामदेव हुले, सुलभा सत्तुरवार, राजेंद्र वाघ, राज अहेरराव, आण्णा जोगदंड, महेंद्र गायकवाड, अरुण कांबळे, कैलास भैरट, श्रीकांत कदम, प्रतिमा काळे, शामराव सरकाळे, सुभाष चटणे आदींनी कविता सादर केल्या. 

गुणवंत कामगार कल्याण मंडळातर्फे आकुर्डीत आयोजित कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक तथा कामगार नेते अरुण बोऱ्हाडे, प्रवचनकार नलिनी राजहंस, बिना इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष आजम खान उपस्थित होते. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण, शब्दधन काव्यमंचचे सुरेश कंक, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे राज अहेरराव, विधीज्ज्ञ अंतरा देशपांडे, मंडळाचे विभागीय पदाधिकारी प्रकाश शिंदे, शंकर नाणेकर, संपत खैरे यांनी मनोगत व्यक्त केले.

बाळासाहेब साळुंके यांनी प्रास्ताविक केले. तानाजी एकोंडे आणि सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. राजेश हजारे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories