news
clock
तळेगाव दाभाडेमध्ये ३ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

तळेगाव दाभाडेमध्ये ३ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

 तळेगाव दाभाडेमध्ये ३ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

पिंपरी, ता. २४ - रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व आमदार सुनील शेळके फाउंडेशन यांच्या वतीने ३ मे २०२६ सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे येथील मारुती मंदिर चौकाजवळील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे-पाटील प्राथमिक शाळेत हा सोहळा पार पडणार आहे. 

आगरजू कुटुंबांतील वधू-वरांचा विवाह थाटामाटात पार पडावा या उद्देशाने या सामुदायिक विवाह सोहळा आयोजिला जातो. सहभागी होणाऱ्या जोडप्यांची पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. 

विवाह सोहळ्यानंतर सर्वांसाठी भोजनव्यवस्था असणार आहे. 

याशिवाय, वधू-वरांना संसारोपयोगी भांड्यांचा संच, गॅस सिलिंडर व रेशनिंगसह आवश्यक साहित्य देण्यात येणार आहे. विवाह प्रमाणपत्राची सोय करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी नारायणराव काळोखे नागरी पतसंस्था, समर्थ चौक, तळेगाव दाभाडे स्टेशन परिसर येथे संपर्क साधावा. या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी इच्छुकांनी १५ एप्रिलपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories