news
clock
'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेची नियोजन बैठक, यंदाची स्पर्धा वाघोलीमध्ये होणार

'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेची नियोजन बैठक, यंदाची स्पर्धा वाघोलीमध्ये होणार

'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेची नियोजन बैठक, यंदाची स्पर्धा वाघोलीमध्ये होणार  

पिंपरी, ता. २५ - 'महाराष्ट्र केसरी - २०२६' कुस्ती स्पर्धा १८ ते २२ मार्च दरम्यान वाघोलीमध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व रामकृष्ण कर्तव्य फाउंडेशन यांच्या वतीने ही या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. 

सदर बैठकीत महाराष्ट्र केसरी कुस्ती आखाड्यासाठी मैदान व्यवस्था, खेळाडूंची सोय, प्रेक्षकांसाठी सुविधा, पार्किंग व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा  करण्यात आली. स्पर्धा भव्यतेने, दिमाखात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्रितपणे सहकार्य करण्याचे सांगितले.  

तसेच स्पर्धेच्या नियोजनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्याचा संकल्प केला. 

बैठकीला मेघराज कटके, रामकृष्ण सातव, नवनियुक्त नगरसेवक रामदास दाभाडे, अनिल सातव, राजेंद्र पायगुडे, कमलाकर सातव उपस्थित होते.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories