ख्यातनाम लेखक मंजुल भारद्वाज यांचे आज 'पत्रकार, तुम्ही-आम्ही, आपण सर्व' विषयावर आज व्याख्यान

ख्यातनाम लेखक मंजुल भारद्वाज यांचे आज 'पत्रकार, तुम्ही-आम्ही, आपण सर्व' विषयावर आज व्याख्यान

ख्यातनाम लेखक मंजुल भारद्वाज यांचे आज 'पत्रकार, तुम्ही-आम्ही, आपण सर्व' विषयावर आज व्याख्यान

पिंपरी, ता. २३ - संत गाडगेबाबा महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त माध्यम क्षेत्रातील तसेच माध्यमाशी निगडित असलेल्या सर्वांसाठी विशेष व्याख्यान व संवाद चर्चा कार्यक्रम सोमवारी (ता. २३) आयोजित केला आहे. पिंपरीतील  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 

या कार्यक्रमात ख्यातनाम नाटककार-दिग्दर्शक-लेखक  मंजुल भारद्वाज (मुंबई) 'पत्रकार, तुम्ही-आम्ही, आपण सर्व' या विषयावर संवाद साधतील. पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, विजय जगताप, नजीम मुल्ला यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

माध्यमक्षेत्राशी निगडीत असलेल्या मंडळीनी आवर्जून या व्याख्यानाला उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories