news
clock
भरधाव स्विफ्ट कारची ओला स्कूटरला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी

भरधाव स्विफ्ट कारची ओला स्कूटरला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी

भरधाव स्विफ्ट कारची ओला स्कूटरला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी

पिंपरी, ता. ४ - मावळ तालुक्यात बघलवाडी-नवलाख उंबरे रस्त्यावर मंगळवारी (ता. ३) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भरधाव कारच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे व एक जण जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर शंकर लोहार (वय २९, रा. ताथवडे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. लोहार त्यांच्या इलेक्ट्रिक ओला स्कूटरवरुन मित्र चंद्रकांत शिवाजी हेमनार यांच्या सह फ्लिपकार्ट कंपनीकडे जात होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारने  त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात लोहार हे जखमी झाले असून त्यांच्या मित्राचा मृत्यू झाला आहे.

 कारचालक अविनाश कैलास ससाणे (रा. वेल्हावळे, ता. खेड, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १०६(१), १२५(अ)(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ३) सायंकाळी ५.३४ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक नाही. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories